Being The Change (Marathi Podcast) show

Being The Change (Marathi Podcast)

Summary: “Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in inspiring change through her thought-provoking works like films and documentaries. ---- "बदल पेरणारी माणसे" हा "बीइंग द चेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतात

Podcasts:

 Ep.13 Taking Education Beyond The Walls & The Books ft. Sachin Usha Vilas Joshi, Education Activist, Researcher Director- Espalier Experimental School | File Type: audio/mpeg | Duration: 3079

Education Researcher Sachin Usha Vilas Joshi talks about what education actually means, demystifies the glamour around International Boards, talks about skills that kids need to imbibe today to be future career ready and need for highly educated youth to become part of the education sector... "Passing an exam is not an indicator of intelligence..." " I was a labelled a dumb donkey in school... but today I hold eight degrees..." शिक्षण म्हणजे नेमकं काय? इंटरनॅशनल शाळा आणि त्यांच्या भोवतीचं वलय, भविष्यातील करीयर घडवण्यासाठी मुलांमध्ये आज कोणते गूण विकसित केले पाहिजेत,आणि उच्च शिक्षित तरुणांनी शिक्षण क्षेत्रात उतरण्याची गरज, या सगळ्या विषयी सांगत आहेत शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी, बदल पेरणारी माणसेच्या या भागात... "मी शाळेत अस्ताना,मला सगळे गाढव म्हणायचे... आज माझ्याकडे आठ पदवी आहेत..." "नुसती परिक्षा पास असणं, हे बुद्धिमत्तेच लक्षण नहिये..."

 Ep.12 Understanding Addictions ft. Mukhta Puntambekar, Director- Muktangan Deaddiction Centre, Pune | File Type: audio/mpeg | Duration: 2357

"Biggest victims of any addiction are the children in the family..." "A drink makes you feel good temporarily, but the negative effects it has on your body and mind are long term...." Mukta Puntambekar, Director, Muktangan Deaddiction Centre, Pune shares with us her 26 year experience of dealing with addict patients, the impact of addiction on society and most importantly the impact on children... Its time to check our lifestyle, if we want our next generation to be healthy and safe from addictions.... "व्यसनाचे सगळ्यात मोठे बळी, हे त्या घरातली लहान मुलं ठरतात..." "दारू चा एक प्याला तुम्हाला क्षणिक आनंद देतो,पण मनावर आणि शरीरावर होणारे त्याचे नकारात्मक परिणाम दूरगामी असतात..." मुक्ता पूणताम्बेकर,संचालिका,मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,पुणे,व्यसनी पेशंटना हाताळण्याच्या त्यांच्या 26 वर्षांच्या अनुभवाबद्दल, व्यसनांचा समाजावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांवर होणार्या परिणामांबद्दल आपल्याशी बोलत आहेत... जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला निरोगी आणि व्यसनांपासून लांब ठेवायचं असेल,तर वेळ आली आहे आपलीच जीवनशैली तपासून बघण्याची....

 Ep.11 Foresting For The Future ft. Dr. Sheetal Amte Karajgi, CEO at Maharogi Sewa Samiti, Anandwan | File Type: audio/mpeg | Duration: 3677

"whatever you do, if you do not have a purpose, its meaningless..." "doing your work and finding happiness in it is important.." Dr. Sheetal Amte Karajgi, CEO at Maharogi Sewa Samiti, Anandwan, who is also a painter, a forester and photographer, tells us what keeps her going... the stress of handling a community of 2500+ people and also carrying forward the legacy of two generations that changed the face of social activism in the country...In conversation with Rima Sadashiv Amarapurkar in this episode of Badal Pernari Maanse podcast on Ep.Log Media "तुम्ही जे काही काम कराल, त्याच्या मागे जर परपज नसेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही..." "आपलं काम तर करावंच पण त्यातून आनंद मिळणं पण तितकंच महत्वाचं असतं... " डॉ. शीतल आमटे, महारोगी सेवा समिती, आनंदवन च्या सी. इ. ओ, एक चित्रकार, जंगलकर्त्या आणि फोटोग्राफर सुद्धा आहेत. त्या सांगत आहेत कि कार्यरत राहण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा काय आहेत, अडीचशेपेक्षा जास्त माणसांच्या गावाचं कुटुंब चालवण्याचा ताण काय असतो आणि देशातल्या सामाजिक चळवळीचा चेहरा बनलेल्या कुटुंबाच्या दोन पिढ्यांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्या कशा पद्धतीने पेलतात... बदल पेरणारी माणसे च्या या भागात त्या बोलत आहेत रीमा सदाशिव अमरापूरकर यांच्याशी...

 Ep.10 What To Do With Your Child While At Home ft. Sachin Usha Vilas Joshi, Education Activist, Researcher Director- Espalier Experimental School | File Type: audio/mpeg | Duration: 1410

" Let us use this lock down to build a bond with our child..." In this special episode of Badal Pernaari Maanse, Education Activist and Researcher Sachin Usha Vilas Joshi in conversation with Rima Sadashiv Amarapurkar, is telling us how we can use this time to build and strengthen the bond with our child and use this period to keep our children engaged in productive activities that will enhance their brain development and make them happy!!! "हा लॉक डाउनचा काळ आपण आपल्या मुलांबरोबरचे नाते अधिक घट्ट करायला वापरुयात...." बदल पेरणारी माणसेच्या या विशेष भागात शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी सांगत आहेत आपण या काळाचा उपयोग आपल्या मुलांबरोबरचा स्नेहबंध दृढ आणि सुदृढ कसा करता येईल... तसच मुलांना सृजनशील पद्धतीने गुंतवून ठेवून त्यांचा बौद्धीक विकास साधून त्यांना आनंदी कसं ठेवता येइल...

 Ep.9 Taking Maharashtrian Cuisine Globally & Making Women Entrepreneurs ft. Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha Maharashtrian Restaurant | File Type: audio/mpeg | Duration: 2954

" As a woman and a mother, I cannot put the burden of my dreams on my children... I am a mother, but I am also an entrepreneur who believes that every woman is a born management guru and should at least once give her dreams a chance..." In this episode of Badal Pernaari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar Interacts with Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha - Largest International Maharashtrian Restaurant Chain and understands what it takes for a woman to give up a conventional life and start a dream venture, the social attitudes towards woman entrepreneurs and the need to go back to the cultural roots to be able to spear ahead into the future... " एक आई म्हणून माझ्या स्वप्नांचं ओझं मी मुलांवर लादणं योग्य नाही... माझ्या स्वप्नांचं ओझं मीच झेललं पाहिजे... मी आई आहे, पण मी एक व्यावसायिक पण आहे... मला असं वाटतं कि प्रत्येक महिला ही मॅनेजमेंट गुरु असते आणि तिने एकदा तरी तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा..." बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर बोलत आहेत जयंती कठाळे यांच्याशी... त्या पूर्णब्रह्म या अंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जगातल्या सर्वात मोठ्या महाराष्ट्रीय रेस्टॉरंट चेनच्या संस्थापिका आहेत. त्या सांगत आहेत की रुढीबध्द आयुष्य त्यागून स्वतःचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रवास कसा असतो... महिला उद्योजिकांबद्दल असलेला सामाजिक दृष्टिकोन, आणि सांस्कृतिक मुळांना घट्ट धरून प्रगती साधण्याची गरज...

 How To Keep Your Emotional Hygiene Amidst Corona Virus Outbreak ft. Dr Anand Nadkarni, Director - Institute of Psychological Health | File Type: audio/mpeg | Duration: 987

In this period of #Insecurity, we all - rich-poor, young-old, educated-uneducated, everybody in this world are living under the #anxiety of the unknown caused due to #Corona #pandemic. This anxiety is taking a toll on our mental health. Especially the #lockdown and #quarantine might cause more harm than good if we don't take care of ourselves. Let's hear Dr.Anand Nadkarni- Director, Institute Of Psychological Health on this special episode of Ep.Log Media's Badal Pernari Maanse Podcast with Rima Sadashiv Amarapurkar and understand how we can maintain our Mental and Emotional Hygiene and Sanity and use this time to build a better tomorrow for our families, society, country and the whole world. या असुरक्षिततेच्या परिस्थितीत,जगभरातील माणसं,श्रीमंत-गरीब,शिक्षित-अशिक्षीत, लहान मोठे, सगळेच कोरोना मुळे पुढे काय होइल, हे महीती नसलेल्या परिस्थिती मुळे घाबरलेल्या अवस्थेत जगत आहोत.या तणावाचे मानसिक आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहेत. या लॉक डाउन आणि विलगीकरणामुळे तर या घातक परिणामांची व्याप्ती अजून वाढू शकते,अर्थात जर आपण आपली काळजी घेतली नाही तर. डॉ. आनंद नाडकर्णी,डायरेक्टर,इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजिकल हेल्थ, इपी.लॉग मीडियाच्या, रिमा सदाशिव अमरापूरकर सादरीकृत बदल पेरणारी माणसे च्या या विशेष भागात आपल्याला सांगत आहेत की या काळात आपण आपले मानासिक आरोग्य कशा पद्धतीने संभाळू शकतो,आणि आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी चांगलं भवितव्य घडवायला या वेळाचा सदुपयोग हाऊ शकतो. Disclaimer: The content was originally produced by the Institute for Psychological Health and its Media unit AVAHAN.

 Ep.8 Going Beyond Survival ft. Renu Gavaskar- Author, Storyteller, Humanist, Child Right Activist | File Type: audio/mpeg | Duration: 3442

In todays episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar talks to Renu Gavaskar, an author, a story teller, a humanist and a child right activist. Renutai tells us what we as a society should imbibe within ourselves to empower the children, who are going to define the future of this country. बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर,संवाद साधत आहेत रेणू गावस्कर यांच्याशी. रेणूताई एक लेखिका,एक संवादक आणि समाज सेविका आहेत. लहान मुलांच्या हक्कांसाठी त्या कार्यरत असतात. त्या आपल्याला समजावून सांगत आहेत की समाज म्हणून लहान मुलांप्रती आपली जबाबदारी काय असावी, कारण हिच मुलं,आपल्या देशाचं भवितव्य ठरवणार आहेत.

 Ep.7 how the lives of great people in history teach us how to live an enriched life ft. Dr Anand Nadkarni | File Type: audio/mpeg | Duration: 3482

This episode of Badal Pernari Maanse, Is the second and final part of conversation between Rima Sadashiv Amarapurkar and Dr.Anand Nadkarni, a renowned Psychiatrist, founder of Institute of Psychological Health, Social thinker, Playwright and Author.. Here he speaks about how religion, philosophy and history are linked and how the lives of great people in history teach us how to live an enriched life and rise above self and petty differences... बदल पेरणारी माणसेचा हा भाग,रिमा सदाशिव अमरापूरकर आणि प्रख्यात मनोविकास तद्न्य, इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजीकल हेल्थ चे संस्थापक, सामजिक विचारवंत, नाटककार अणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यातील संवादाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे. यामध्ये डॉक्टर सांगत आहेत धर्म,तत्वज्ञान आणि इतिहास यांच्यातील नात्या विषयी,तसंच इतिहासातील महापुरुषांच्या आयुष्यातून आपण स्व अणि मतभेदांवर विजय कसा मिळवू शकतो...

 Ep.6 Bringing Creativity And Social Change Together ft. Dr Anand Nadkarni, Director- Institute For Psychological Health | File Type: audio/mpeg | Duration: 4281

In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, talks to Dr.Anand Nadkarni, a renowned Psychiatrist, founder of Institute of Psychological Health, Social thinker, Playwright and Author.. In this first part of the conversation he speaks about his life journey, his process of creativity and how he counters with his emotions when he feels low... बदल पेरणारी माणसेच्या या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर बोलणार आहेत प्रख्यात मनोविकास तद्न्य, इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजीकल हेल्थ चे संस्थापक, सामजिक विचारवंत, नाटककार अणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णींशी. या संवादाच्या पहिल्या भागात ते बोलत आहेत त्यांच्या जीवन प्रवसाबद्दल, सृजनाची प्रक्रिया अणि जेव्हा त्यांना निराश वाटतं,तेव्हा त्या नकारात्मक भावनांशी ते दोन हात कसे करतात.....

 Ep.5 Never Say No To Learning ft. Dr Achyut Godbole- Renowned Author / Polymath / Humanitarian | File Type: audio/mpeg | Duration: 3520

In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, talks to Achyut Godbole, a turn around CEO for 23 years of biggest companies in the world about what it took to quit that corporate world and dedicate his life to creating literature which brings world knowledge to Marathi readers. A rational humanist talks about his life long love affair with knowledge... Music Credits Artist: Whitesand | Song: Soldier बदल पेरणारी माणसेच्या या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर बोलणार आहेत अच्यूत गोडबोलेंशी, ज्यांनी 23वर्ष जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या सी इ ओ म्हणून चालवल्या आहेत. असं काय होतं,ज्यामुळे ते कोर्पोरेट जग सोडून,आपलं आयुष्य जगभरातलं ज्ञान मराठी साहित्यात आणावसं त्यांना वाटलं.. एक विवेकवादीआणि मानवतावादी मुसाफिर बोलतोय त्याच्या ज्ञानावर असलेल्या प्रेमाबद्दल....

 Ep.4 Transforming Raw To A Champion ft. Prabhat Sinha, Founder- Manndeshi Champions | File Type: audio/mpeg | Duration: 3099

In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, understands from Prabhat Sinha of Manndeshi Champions, how raw talent from hinterlands of Maharashtra become international athletic icons. This is the story of a boy, giving up his well running business of star athlete management in US and returning to his motherland to give a chance to the children here to simply play. A story of courage, sacrifice and a thousand dreams... बदल पेरणारी माणसे च्या या भागात, रिमा सदाशिव अमरापूरकर समजावून घेत आहेत प्रभात सिन्हा यांच्याकडून प्रक्रीया, महाराष्ट्रातल्या अत्यंत मागासलेल्या भागातली पैलू नसलेली प्रतिभा हेरून आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडू तयार करायची... ही गोष्ट आहे,अमेरिकेत चांगला चाललेला, नावाजलेल्या खेळाडूंची मैनेजमेंट करण्याचा व्यवसाय सोडून, मायदेशी असलेल्या मुला मुलींना खेळण्यातला आनंद शिकवण्याची जिद्द घेउन परतलेल्या एका मुलाची.. गोष्ट आहे धैर्य, बलिदान अणि हजारो स्वप्नांची....

 Ep.3 Making Inclusion For The Second Innings ft. Prajakta Wadhavkar, Founder- Tapas Elderly Care Home | File Type: audio/mpeg | Duration: 2275

Check out my latest episode!In this episode, Rima Sadashiv Amarapurkar is in conversation with Prajakta Wadhavkar, founder of 'Tapas' Elderly Care Home, who is trying to change the perceptions in the society about elderly care and the stigma attached to elderly care homes... She speaks about how our senior citizens are the most neglected in our society and we as a society can come a full circle only if this segment is happy. For more info check out http://www.tapashealthcare.com/ Music Credits Artist: Whitesand | Song: Soldier या भागात, रिमा सदाशिव अमरापूरकर, गप्पा मारत आहेत प्राजक्ता वढावकर यांच्याशी. त्यांनी 'तपस' ही ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्था सुरु केली आहे, जी ज्येष्ठांच्या सेवेसन्दर्भातल्या संकल्पना अणि वृद्धश्रमांशी जोड्ले गेलेले समज बदलण्यासाठी काम करते आहे. प्राजक्ता सांगत आहेत की वृद्ध/ज्येष्ठ हे आपल्या समजातला सर्वात दुर्लक्षित घटक आहे अणि जो पर्यंत आपल्या समाजातले ज्येष्ठ हे आनंदी अणि समाधानी होत नाहित,तो पर्यंत आपण समाज म्हणून पूर्णत्व साधू शकत नाही.

 Ep.2 Breaking Taboos and Changing Lives ft. Dr. Girish Kulkarni, Founder- Snehalaya | File Type: audio/mpeg | Duration: 4420

In this episode, we try to understand the life of Girish Kulkarni, who single handedly started the NGO Snehalay, a pioneer organisation working for welfare of Victims of commercial sexual exploitation and trafficking and their children. He explains what it takes to walk a path untaken...and to keep walking until the path becomes a road and eventually a highway, for others to take and do more work to change the lives of those less fortunate than themselves... बदल पेरणारी माणसे च्या या भागात, व्यावसायिक लैंगिक शोषण आणि तस्करीचे बळी झालेली महिला आणी त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी गेली तीन दशके काम करणार्या स्नेहालय या अग्रीम सणस्थेचे संस्थापक गीरीष कुलकर्णी यांच्याशी. ते सांगत आहेत की कोणीच चालत नाही अश्या वाटे वरनं प्रवास सुरु करत, त्या वाटेचा रस्ता अणि मग महामार्ग करायचा,जेणे करुन हा महामार्ग स्वीकारुन इतरांना मदत करायची प्रेरणा निर्माण व्हावी,आणि हे करायला काय काय सोसाव्ं लागतं, कसा असतो हा चित्त थरारक प्रवास.

 Ep.1 Bringing Cultures Together In Marathi Literature feat. Dr. Uma Kulkarni | File Type: audio/mpeg | Duration: 3116

In this maiden episode of “Badal Pernaari Maanse”, we are in conversation with Dr. Uma Kulkarni, who is known for her unparalleled contribution to Marathi literature. She is known for the books she has brought into Marathi from Kannad language for more than last four decades during which time has consistently set the paradigm of translation very high. She speaks about her journey as a translator and how every book has changed her a little bit and made her rich with experiences and understanding of life. This award-winning author and translator has given to the Marathi readers philosophical experiences, which have enriched lives of thousands. "बदल पेरणारी माणसे" च्या पहिल्या वहिल्या भागात, मराठी साहित्यात सिंहाचा वाटा असलेल्या डॉ. उमा कुलकर्णी, त्यांच्या अनुवाद प्रवासाबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. अनुवादाची पातळी सातत्याने उंचावत नेत,गेल्या चार दशकात,कन्नड साहित्य मराठीमध्ये आणण्याचं श्रेय त्यांचं आहे. अनुवादक म्हणून त्यांच्या प्रवासात,प्रत्येक पुस्तक त्यांना कसं बदलत गेलं, त्यांना अनुभवाने शहाणं करत गेलं आणि आयुष्याची समज विस्तारत गेलं,या बद्दल त्या आपल्याशी बोलणार आहेत. मराठी वाचकांसमोर, पुस्तकांमधून विविध अनुभव मांडून,हजारोंची आयुष्य आणि भावविश्व या पारितोषिक विजेत्या लेखिकेने समृद्ध केली आहेत...

 Badal Pernari Maanse - Being The Change Marathi Trailer | File Type: audio/mpeg | Duration: 78

“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Change makers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award winning film maker, who believes in inspiring change through her thought provoking works like films and documentaries. "बदल पेरणारी माणसे" हा "बीइंगदचेंज" या लोकप्रिय इंग्रजी पॉडकास्ट ची मराठी आवृत्ती आहे या कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या अशा माणसांच्या मुलाखती घेतल्या जातील, ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय, हे त्यांच्या कामामधून दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणणे हेच ठरवले आहे. ते काम कोणत्याही क्षेत्रातलं असू शकतं... साहित्य कला, सामाजिक उपक्रम... ही बदल पेरणारी माणसं त्यांच्या आयुष्याबद्दल ध्येयांबद्दल आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या क्षणांबद्दल बोलणार आहेत रिमा अमरापूरकर यांच्याशी, रिमा एक चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत, ज्या स्वतः त्यांच्या उद्बोधक चित्रपट आणि माहितीपटांच्या माध्यमांतून बदल घडवून आणायला प्रयत्नशील असतात

Comments

Login or signup comment.