My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी

Summary: आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते. पैसा कसा हाताळावा, आर्थिक नियोजन म्हणजे काय, त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व काय, योग्य गुंतवणूक कशी करावी या विषयावर आपण येथे चर्चा करू.

Join Now to Subscribe to this Podcast
  • RSS
  • Artist: Shilpa Wagh
  • Copyright: Copyright 2020 Shilpa Wagh

Podcasts:

 फॉरेन एक्सचेंज रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 482

फॉरेन एक्सचेंज रिस्क चा सामना कसा करावा?  भारताबाहेरील देशांमध्ये गुंतवणूक करूच नये का? 

 मार्केट टाइमिंग रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 452

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?  मार्केट  कुठच्या दिशेने जाईल?  आताच्या परिस्थितीमध्ये मी गुंतवणूक करावी का?  अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लोक विचारतात.  खरंतर हे सर्व प्रश्न मार्केट टाइमिंग ची संबंधित असतात.

 इंटरेस्ट रेट रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 524

नमस्कार मंडळी.  गुंतवणुकीतील विविध धोके या  सिरीज च्या पुढच्या भागांमध्ये  आपले स्वागत आहे.  प्रसिद्ध आर्थिक सल्लागार गौरव  मे शुरू वाला यांच्या  Investment Risk: Two sides of the same coin या पुस्तकावर आधारित ही सिरीज आहे.आज आपण इंटरेस्ट रेट  रिस्क विषयी अधिक जाणून घेऊ.  सर्वात आधी ही रिस्क कुठच्या पद्धतीच्या गुंतवणूक गाना लागू होते  हे बघू.  ज्या गुंतवणुका आपल्याला  आपल्या मुद्दलावर एक ठराविक व्याज देतात अशा सर्व गुंतवणूक  ही रेस्क लागू होते.

 कंट्री रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 540

आज आपण कंट्री रिस्क विषयी अधिक जाणून घेणार आहोत. ही रिस्क देशाच्या आर्थिक स्थिरतेवर आधारित असते.अशा परिस्थितीचा सामना जर आपल्याला करावा लागला तर आपली गुंतवणूक अशा कंट्री रिस्क पासून किती सुरक्षित असेल, याचा विचार आपल्याला करायला हवा.

 मिस्मॅच रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 397

आज आपण Mismatched risk विषयी माहिती घेणार आहोत. मिस मॅच म्हणजे बरोबर सांगड न घातलेले किंवा न जुळणारे. आपल्या गुंतवणुकीची त्याचा काय संबंध असेल बरं?

 क्रेडिट रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 460

आज आपण क्रेडिट रिस्क विषयी चर्चा करू. एखाद्याला उधारीवर पैसे देताना किंवा एखाद्या गुंतवणुकीत पैसा गुंतवताना आपल्या पैशाला क्रेडिट रिस्क किती आहे याचा अवश्य विचार करा.

 लिक्विडिटी रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 609

आपल्याला लिक्विडिटी रिस्क  अनुभवायला लागू नये यासाठी आपण काय केले पाहिजे हे आता आपण पाहू.

 मार्केट रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 661

सर्वसाधारणपणे मार्केट म्हटलं की आपल्याला  शेअर बाजार आठवतो. शेअर बाजारातील किमतीच्या चढ-उतारामुळे आपल्या गुंतवणुकीची एकंदर व्हॅल्यू ही कमी जास्त होत असते.  हे सर्व बाजारातील परिस्थितीशी संलग्न  असते.  यालाच मार्केट  रिस्क.असे म्हणतात.

 री इन्व्हेस्टमेंट रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 602

आज आपण री इन्व्हेस्टमेंट रिस्क या धोक्याविषयी जास्त जाणून घेऊ. 

 सिस्टिमॅटिक आणि अनसिस्टिमॅटिक रिस्क | File Type: audio/mpeg | Duration: 733

जेव्हा आपण एखाद्या  सिस्टीम चा भाग असतो  तेव्हा त्या सिस्टीमचे निगडित जे काही धोके संभवतात ते आपसूकच आपल्या वाटी येऊ शकतात. गुंतवणूक योजनांमध्ये कशा पद्धतीचे सिस्टिमॅटिक आणि अनसिस्टिमॅटिक  धोके असू शकतात बरं? या धोक्यांचा आपल्या गुंतवणुकीवर होणारा प्रभाव कमी करण्याच उपाय?

 गुंतवणूक नियोजनातील विविध धोके - 1 | File Type: audio/mpeg | Duration: 470

गुंतवणूक म्हटली ती त्याच्याशी निगडीत धोके आलेच. एका नाण्याच्या दोन बाजू. गुंतवणूक करताना या संभाव्य धोक्यांचा विचार करणे योग्य ठरते.

 शेअर बाजारातील गुंतवणुकीचे पर्याय | File Type: audio/mpeg | Duration: 666

महागाई वर मात करायची असेल तर शेअर बाजारातील गुंतवणुकीला पर्याय नाही हे तर आपल्या सर्वांना मान्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान किंवा वेळ आपल्याकडे उपलब्ध नसेल तर काय अन्य पर्याय आपल्याकडे आहे याविषयी आज आपण चर्चा करू.

 शेअरबाजारात गुंतवणूक ?? | File Type: audio/mpeg | Duration: 764

शेअर मार्केट म्हणजे जुगार. शहाणे असाल तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. अशी अनेक वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणी कडून किंवा नातेवाईकांकडून आपण ऐकली असतील. परंतु महागाईचा दर म्हणजे inflation पाहता यापुढे जाऊन काहीतरी गुंतवणूक करणं आवश्यक ठरतं. अशी गुंतवणूक जी महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा देईल.

 निवृत्ती नियोजन | File Type: audio/mpeg | Duration: 580

प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाच्या प्रवासामध्ये निवृत्ती नियोजन हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. उतारवयामध्ये योग्य तेवढा पैसा गाठीशी नसल्यामुळे आणि चरितार्थासाठी इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक वरिष्ठ नागरिकांना हलाखीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. निवृत्ती हा एक महत्वाचा टप्पा ठरतो. याचं कारण असतं ही साधारणपणे निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचा पगार आपल्या हातात येत नाही. दैनंदिन जीवनातील खर्चासाठी पूर्णपणे हाती असलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून राहावे लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हयात असेपर्यंत ही गुंतवणूक आपल्याला पुरेशी पडेल का हा प्रश्न सतत भेडसावत असतो.

 आर्थिक उद्दिष्टांच्या नियोजनाकडे | File Type: audio/mpeg | Duration: 633

गेल्या काही एपिसोडमध्ये आपण आर्थिक नियोजनाचे निगडित विविध टप्प्यांची माहिती घेतली. सर्वात पहिली पायरी म्हणजे संकटकालीन निधी इमर्जन्सी फंड, त्यानंतरची दुसरी पायरी म्हणजे विमा नियोजन इन्शुरन्स प्लॅनिंग. हे दोन मूलभूत टप्पे ओलांडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आपण आपल्या इतर आर्थिक उद्दिष्टांच्या नियोजनाकडे वळू.

Comments

Login or signup comment.